जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी केंद्राजवळ पवन यशवंत पाटील (वय-३७) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ५ मे रोजी रात्री १ वाजता पवन हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून बाळा सोनवणे आणि भुषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांनी पवन याला शिवीगाळ करून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पवन याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाळा सोनवणे आणि भुषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.