मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता याचं पाहुण्याचा आज नामकरण सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना नुकतेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. याचं चिमुकल्याचा राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा साजरा झाला आहे. यावेळेस राज ठाकरे यांनी नातवाचे किआन असे नाव ठेवले व प्रभोधनकारांची ५ वी पिढी सुरु झाली असेही ठाकरे यावेळेस बोलले. ५ एप्रिलला नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करतं माहिती दिली होती.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे २०१९ साली लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.आता अमित ठाकरे यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांना आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. यावेळेस त्यांनी परिवारासोबत हि फोटो शूट केल्याचे दिसत आहे
राज ठाकरे यांना आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात तत्काळ दाखल झाले होते. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले होते.नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातवरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.