भडगाव : प्रतीनिधी
कोविडच्या संक्रमनामुळे तब्बल दोन वर्षांपासून गावात कुस्त्यांचे आयोजन न झाल्यामुळे दोन वर्षे कुस्ती शौकिणांचा मोठा हिरमोड झाला होता मात्र तब्बल दोन वर्षानंतर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुकयातील कजगाव येथे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली होती. विविध गावातील मल्लानि व कुस्त्या शौकिनांनी आनंद घेतला.
यावेळी विविध मल्लांनि चित्तथराक डावपेजाने कुस्ती शौकिणांचा चांगलाच उत्साह वाढवला होता. यावेळी आखाडा पूजन भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व माजी सैनिक समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमोल शिंदे, समाधान पाटील, अण्णा बोरसे, अश्रफ खाटीक, अक्षय मालचे, सुनील वाकोडे, पोपट सोनवणे, पंकज भालेराव, तात्या पहिलवान, दीपक माने, विजय महाजन, विनोद हिरे, नितीन महाजन, समाधान पवार, अनिल चौधरी, अनिल मालचे, निवृत्ती बोरसे, राकेश परदेशी, राहुल बोरसे, आकाश येवले व असंख्य ग्रामस्थ व कुस्तीशौकीन मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस हेडकॉन्स्टे नरेंद्र विसपुते पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी होमगार्ड राजेंद्र सूर्यवंशी सचिन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.