Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»” युवा पिढीत देशप्रेम जागृत करण्याचे काम विद्यापीठ करतात.” डॉ.सुनील कुलकर्णी यांचे प्रतिपादन
    चाळीसगाव

    ” युवा पिढीत देशप्रेम जागृत करण्याचे काम विद्यापीठ करतात.” डॉ.सुनील कुलकर्णी यांचे प्रतिपादन

    SaimatBy SaimatMay 5, 2022No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    चाळीसगाव :- प्रतिनिधी मुराद पटेल 
    येथील नानासाहेब यशवंततराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यलयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा दिनांक पाच ते सात मे दोन हजार बावीस दरम्यान आयोजन करण्यात यात आले आहे.
        युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा चे उद्घाटन आज दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी मा. डॉ.सुनील कुलकर्णी संचालक विद्यार्थी विकास विभाग,क.ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण, व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन मा.दादासो.डॉ.संजय गोपाळराव देशमुख यांनी अध्यक्षस्थान भूषविले.व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव मा.आबासाहेब संजय रतनसिंग पाटील, प्रमुख अतिथी मा.प्राचार्य,डॉ.दिलीपसिंह एस. निकुंभ,मा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे, मा.प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी मा.डॉ.जी.डी.देशमुख,कार्यशाळा समन्वयक डॉ.आर.पी.निकम, डॉ.जी.बी.शेळके,प्रा.के.पी. रामेश्वरकर,डॉ.आर.बी.चव्हाण, प्रा.एस.एन.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    मा.डॉ.सुनील कुलकर्णी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे नेहमी विद्यार्थीभिमुख कार्यक्रमांचे विविध महाविद्यालयांमध्ये आयोजन करत असते.नव्या पिढीला जागृत करणे,तसेच देशप्रेम जागृत करण्याचे काम आपले विद्यापीठ करत असते. देशासाठी प्राण देण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाली पाहिजे.मातृभूमीसाठी आता शिर कापण्याची किंवा बलिदान करण्याची आवश्यकता नसून आपल्या राज्याला सुराज्यात परिवर्तन करण्याचे काम युवा पिढीच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करायचे आहे.सामाजिक भावना जागवण्याचे काम, मानवतावादी विचार कार्यशाळेच्या माध्यमातून जायला हवा.देशाचे उज्ज्वल भविष्य हे युवा पिढीच्या हातात आहे. एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण विश्वात आपल्या भारत देशाचे नाव मोठे झाले पाहिजे.त्यासाठी आपल्या युवापिढीने विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करणे, परिश्रम घेणे आवश्यक आहे. दैववादाऐवजी कर्मवादावर आपला विश्वास असायला हवा. आज मितीस भारतीय विद्यार्थी  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये, नासामध्ये वैज्ञानिक म्हणून काम करतांना आपल्याला दिसत आहेत.त्याचप्रमाणे आपला देश महासत्तेचे स्वप्न पहात आहे. आपण महासत्तेच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत. हे स्वप्न भंग होणार नाही याची काळजी युवापिढीने घ्यायला हवी असे उपस्थित असलेल्या युवा विद्यार्थ्यांना आवाहन केले.
       मा.डॉ.सुनील कुलकर्णी पुढे म्हणाले की, आजच्या युवा संसद कार्यशाळेतून चांगले संसदपटू तयार झाले पाहिजे. भविष्यातील संसदपटू हा वक्तृत्वाने, सद् विचाराने, चारित्र्यसंपन्न असला पाहिजे. नीतिमान असला पाहिजे, कामसू असला पाहिजे, त्याबरोबर भविष्यात त्यांनी सामान्य माणसासारखे राहुन सामान्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत.आपल्या हक्काची, अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव त्याबरोबर देशात वाढणारा वंशवाद नष्ट करण्यासाठी आपण चांगले काम करण्यासाठी समाजकारणातून राजकारणाकडे या,आपल्या जीवनाकडे सकारात्मकतेने बघा, नकारात्मकतेने बघू नका, जिद्द,चिकाटी आणि मेहनत घ्या. आपला दृष्टिकोन बदला आणि आपल्या देशाच्या प्रगतीपथावर नेण्यास योगदान द्या असे सुचविले. तसेच आपले विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक,मानसिक व व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी दिवसरात्र काम करते.विद्यापीठामार्फत विविध प्रकारच्या योजना विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जातात. आर्थिक दुर्बल घटक योजना, कमवा आणि शिका योजना अशा अनेक योजना बरोबर “युवारंग युवक महोत्सव” म्हणजे विद्यार्थी घडविण्याचे उत्तम व्यासपीठ आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे.असे आग्रही मतही नोंदवले.आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणात्मक आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवीत असते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील आणि राज्यातील एक उपक्रमशील असलेले महाविद्यालय म्हणून मा.डॉ. सुनिल कुलकर्णी यांनी  महाविद्यालयाबद्दल गौरवोद्गारही काढलेत.
     प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव मा.आबासाहेब संजय रतनसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. युवा संसद कार्यशाळेतून युवा पिढी नक्कीच राजकारणात येतील,आत्मविश्वासाने नक्कीच ते भविष्यात चांगले काम करून दाखवतील असा आशावाद व्यक्त करून विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
       मा.प्राचार्य डॉ.दिलीपसिंह एस. निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या  गुणात्मक प्रगतीबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्यासाठी युवा संसद कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. आपल्याला जे शिकायला मिळेल त्याचा उपयोग आपण भविष्यात समाजासाठी आणि देशासाठी केला पाहिजे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
       मा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना जाण्याची संधी मिळते.त्या पद्धतीने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यसभेमध्ये जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून युवा संसद कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
       संस्थेचे व्हा.चेअरमन मा. दादासो.डॉ.संजय गोपाळराव देशमुख अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले.” कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी आपल्याला युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे ऋण व्यक्त केले. आमच्या महाविद्यालयात युवा संसद कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वकृत्व संपन्न, उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी समाजकारणातून पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्त गाव, स्वच्छता अभियान अशा छोट्या मोठ्या उपक्रमातून काम करून नंतर राजकारणाच्या आधाराने आपल्याला चांगले काम करीत पुढे येता येणार आहे.कार्यशाळेत जे मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्याचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी, समाजासाठी आणि देशासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस आर.जाधव यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा सादर केला.संस्था आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि गुणात्मक विकासासाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करीत असते.तसेच प्रत्येक कार्यक्रमासाठी संस्था नेहमीच सहकार्याच्या भावनेने सर्व काही उपलब्ध करून देत असते.त्याचप्रमाणे युवा संसद कार्यशाळेसाठी जळगाव, धुळे,आणि नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आणि विद्यार्थ्यांना युवा संसद कार्यशाळेतून जे ज्ञान मिळणार आहे त्या ज्ञानाचा उपयोग आपण योग्य पद्धतीने करून घ्यावा व उत्कृष्ट संसदपटू होऊन समाजासाठी देशासाठी काम करण्याचे आवाहन केले.
       प्राचार्य मा.डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्य मा.डॉ.एस. डी.महाजन,विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य मा.डॉ.जी.डी.देशमुख,उपप्राचार्या मा.डॉ.उज्वल मगर,उपप्राचार्य मा.डॉ.पी.जे.परमार यांचे मार्गदर्शन व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.डी.देशमुख समन्वयक डॉ.आर.पी.निकम,डॉ.जी.बी. शेळके,प्रा.के.पी.रामेश्वरकर, डॉ.आर.बी.चव्हाण,प्रा.एस.एन. पाटील,कार्यालयीन अधीक्षक श्री. ए.बी.सूर्यवंशी, श्री.संदीप पवार,श्री.एन.एस. कांबळे, श्री.प्रशांत पाटील,श्री.अर्जुन केंदळे श्री.पी.आर.बाविस्कर,श्री. कैलास चौधरी,श्री.आर.पी. कंरकाळ,श्री.आनंद पाटील,श्री.विजय वानखेडे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू-भगिनी युवा संसद कार्यशाळा स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ.उज्ज्वला नन्नवरे यांनी केले.इशस्तवन आणि स्वागतगीत प्रा.कु.सानिका कुलकर्णी यांनी सादर केले.तर आभार डॉ.जी.डी. देशमुख यांनी व्यक्त केले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Chalisgaon : वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात पथदिवे बंद तर गटारी तुंबल्या

    December 18, 2025

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सर्रासपणे सुरू

    December 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.