समर्थ बहुउद्देशीय संस्था जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

0
12

जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांना 2018-19 या वर्षाचा जिल्हा युवक युवा पुरस्कार( संस्था) हा माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते आज 1 मे रोजी पोलिस कवायत मैदानात ध्वजारोहण प्रसंगी प्रदान करण्यात आला

समर्थ संस्थेने जिल्ह्या भरातच नव्हे तर राज्यभरात सांस्कृतिक व सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील असंघटित युवकांना संघटित करून तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्तगुणांना संधी देऊन भरीव कामगिरी केली आहे

समर्थ संस्थेला आज पर्यंत सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत अनेक सांघिक व वैयक्तिक पारितोषिके संस्थेने पटकावली आहेत तसेच शासनाच्या महाराष्ट्राच्या कलापथकाच्या शासन निर्णयातही संस्थेला मानाचे स्थान देऊन गौरविण्यात आले आहे व त्या अनुषंगाने संस्था ही पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्याभरात आपले शासकीय विविध योजनांचे पथनाट्य सादर करीत असते. समर्थ संस्थेच्या भरभराटीत संस्थेचे आधारस्तंभ रमेश जाधव अभिमन कोळी, कलावती भोई, विजय कोळी यांनी व संस्थेला यशाच्या मार्गावर चालवणारे संस्थेचे अध्यक्ष- योगेश लांबोळे, उपाध्यक्ष-महेश कोळी सचिव-विशाल जाधव ,अमोल जाधव रोहिणी निकम, भावेश पाटील, सागर सदावर्ते ,रवी परदेशी, संकेत राऊत मयूर भंगाळे, शुभम सपकाळे, मोक्षदा लोखंडे, श्रीकांत ढाबे ,कृष्णा पाटील, अंकुश काकडे ,विशाल सदावर्ते, कृष्णा बारी ,दीपक पाटील,दीपक भुसारी, अक्षय पाटील, श्‍वेतांबरी पाटील, लीना पाटील, तृप्ती बाक्रे पायल साळवे ,प्रणिता शिंपी ,संजना तायडे ,पूर्वा जाधव, सरिता तायडे, मयुरी सुतार, समर्थ जाधव ,कोमल पाटील, युगंधरा ओहोळ ,गणेश सोनार नेहा पवार ,स्वराली जोशी या सर्वांच्या भरीव कामगिरीने संस्था आपली वाटचाल करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here