रावेर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, यांच्या आदेशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रावेर लोकसभा अध्यक्षपदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, राजेश पाटील , राजेश वानखेडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे , परेश कोल्हे, कुणाल पवार, रोहन सोनवणे आदिंनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
