सोयगावात भगवान परशुराम यांची जयंती साजरी

0
30
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
 सोयगाव शहरात सर्व समाजाच्या उपस्थितीत भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान परशुराम यांच्याप्रमाणे आपल्याला सर्व विद्या संपन्न होता आलं पाहिजे असे मनोगत डॉ. संजय शहापुरकर यांनी केले. राष्ट्र उभारणीत ब्राम्हण समाजाने कायमच महत्वपूर्ण योगदान दिले आहे. नवीन पिढीने सुद्धा राष्ट्रधर्म निभावण्यासाठी व्रत हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रभाकर कुलकर्णी यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करत उच्च शिक्षण घेण्यासाठी आवाहन केलं.
तसेच, सर्व समाजात समरस भाव निर्माण करण्यासाठी ब्राम्हण समाजाने पुढाकार घ्यावा, सर्व समाज आपला भाऊ आहे आणि आपणही त्याचं देणं लागतो ही भावना जागृत ठेवून तरुणांना कार्य करायचं आहे असे मनोगत कल्पेश जोशी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विष्णू मापारी यांनी गावातील एखाद्या चौकाला भगवान परशुराम यांचे नाव देण्याची उप नगराध्यक्ष सौ सुरेखाताई काळे यांच्याकडे विनंती केली व ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष हितेश कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी उप नगराध्यक्ष सौ सुरेखाताई काळे, नगरसेवक सौ संध्याताई मापारी, सौ अनुसयाताई मापारी, ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष हितेश कुलकर्णी, सचिव सुनील जोशी तसेच शांताराम जोशी, प्रभाकर कुलकर्णी, महेश जोशी, सौ. मालती जोशी, सौ. विद्या कुलकर्णी, विनायक जोशी, विष्णू मापारी, सुनील जगताप, हर्षल रोकडे, रत्नाकर सोहनी, काशिनाथ बारी, पद्माकर सोहनी, रोहित गिरी, कल्पेश जोशी, विवेक जोशी आदी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here