महाराष्ट्रातील तमाशा थांबवावा – नाना पटोले

0
14

नागपूर : वृत्तसंस्था
राज ठाकरे यांचा आजचा भाषण कधीकाळी त्यांना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुपारीबाज म्हटले होते, त्याच पद्धतीचे होते. आज जनतेच्या प्रश्नावर ते बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे. म्हणून राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन दिलेल्या अल्टिमेटमचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात भोंग्यांबाबत कारवाई झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 4 तारखेच्या इशाऱ्याने काहीच होणार नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाशा थांबवावा असाही टोला लगावला.

कोणालाही कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.. आणि प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज ठाकरे यांना नाही. कांग्रेस कुठल्याही धार्मिक वादांमध्ये पडू इच्छित नाही आणि पडणार ही नाही. आमच्यासाठी विकासाचे तसेच महागाई व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहे. आम्हाला कोणाच्याही वादात पडायचे नाही. तसेच 4 तारखेनंतर होणाऱ्या घटनेसंदर्भात शासन सक्षम आहे, असे पटोले म्हणाले.

कोणीही बेकायदेशीर कृत्य करेल तर त्यांच्यावर कारवाई करायला सरकार सक्षम आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष या वादात पडणार नाही. केंद्र सरकारचा अपयश लपवण्यासाठी राज्यात हे सर्व वाद निर्माण केले जात आहे आणि काही लोकांचा वापर करून राज्यात धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील मशिदीवरचे भोंगे बघायला त्यांनी जावे, असा टोला राज ठाकरे यांना हाणला. मशिदीवरील भोंगे या संदर्भात प्रशासनाने तपासणी केलेली आहे. सर्व धार्मिक स्थळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन प्रमाणे भोंग्यांचे आवाज ठेवावे, असे म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here