गिरणा वॉटर कप राज्याच्या नदी विकासासाठी “रोल मॉडेल” – अभिनेता सयाजी शिंदे

0
25

 भडगाव : प्रतिनिधी 
सुमारे 400 किलोमीटर पायी पदयात्रा करुन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. गिरणा नदीच्या विकासासाठी त्यांनी राबवलेले  गिरणा पुनरुज्जिवन अभियान परिसराच्या विकासासाठी एक अभिनव उपक्रम ठरणार असून हे अभियान गिरणा खोऱ्याच्या विकासाची सामाजिक चळवळ झाली असून निश्चितच ही चळवळ नदी विकासासाठी राज्याला एक दिशादर्शक सामाजिक चळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत खा. उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून गिरणा वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ तसेच महाश्रमदान  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री गिरीश भाऊ बोलत होते. सयाजी शिंदे यांनी कुदळ मारून महाश्रमदान अभियानाचा शुभारंभ केला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रमसैनिकांच्या कामाचे कौतुक करुन गिरणा वॉटर कप मध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

याप्रसंगी अभिनेता सयाजी शिंदे यांनी गिरणा पुनरूज्जीवन उपक्रमाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील संकल्पित गिरणा पुनरूज्जीवन अभियानाअंतर्गत आयोजित *गिरणा वॉटर कप स्पर्धा राज्याच्या नदी विकासासाठी “रोल मॉडेल”  ठरणार आहे*. गावाजवळ नदी असेल  तर त्या गावाचा विकास झालाच पाहिजे असे असताना
गिरणा नदी सारखी नदी आपल्या परिसरात असून देखील परिसराचा हवा तेवढा विकास झालेला नाही. ही खंत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जाहीर मांडली त्याचे राज्यभरातून कौतुक झाले.त्यांची पायी परिक्रमा शाश्वत विकासाची पक्की खूणगाठ असून अशी अभिनव पायी पदयात्रा काढणारे आणि वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करणारे ते राज्यातील एकमेव खासदार असून त्यांचे अभिनंदन करतो. वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी मला बोलविल्याबद्दल खासदार उन्मेश दादा यांचे आभार मानून   या उपक्रमाला मनापासून आशीर्वाद देतो.ही स्पर्धा राज्यासाठी दिशादर्शक ठरेल या बद्दल माझ्या मनात शंका नाही असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी रणरणत्या उन्हातही हजारो श्रमसैनिक  श्रमदानासाठी एकत्र आले होते. याप्रसंगी प्रांताधिकारी विक्रम बांदल, जी.प.सदस्य मधुकर काटे,पाचोरा तहसीलदार कैलास चावरे ,तहसिलदार मुकेश हिवाळे , जळगाव ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भाऊ भंगाळे,पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,

भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, उमंग महिला समाजशिल्पी  परिवाराच्या संस्थापिका सौ संपदाताई पाटील, साधनाताई पाटील, माया शर्मा, आरस्ता माळदकर, डॉ. नीलकंठ पाटील, गटविकास अधिकारी रमेश वाघ  विस्ताराधिकारी बी.एन.पाटील, या समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी प.स.सदस्य रवींद्र भाऊ चौधरी तरवाडे कर सामाजिक कार्यकर्ते चेतन वाघ, विलासराव चौधरी नांद्रा प.स. सदस्य जळगाव अ‍ॅड.हर्षल चौधरी, रावसाहेब पाटील नायब तहसिलदार भडगाव ,विनोद माळी पंचायत समिती भडगाव, पवन शेठ ( भवानी जिनिंग संचालक भडगाव) कोठलीचे समाधान पाटील फौजी,  सुखदेव जाधव ग्राम विकास अधिकारी (कोळगाव), सुपडू बोरसे (ग्राम विकास अधिकारी गोंडगाव, संदीप सैंदाणे (ग्रामसेवक) कोळगाव, नागरे भाऊसाहेब (ग्रामसेवक) शिंदी,  नाळ कुटे आप्पा (ग्रामसेवक)  वाक ,  अनारसिंग राठोड (ग्रामसेवक) वडजी, नितेश पाटील (ग्राम विकास अधिकारी पिंपरखेड), दीपक पाटील (ग्रामसेवक वलवाडी), चंद्रकांत गढरी (ग्रामसेवक पिचर्डे बात्सर), कृष्णा पाटील (बोदर्डे),  देसले आप्पा (पिंप्रीहाट) , राम सिंग जारवाल (तलाठी पिचर्डे), धनगर साहेब (ग्रामसेवक घुसर्डी),  राजेंद्र  पाटील (ग्रामसेवक बांबरुड),  अमरसिंह पाटील (ग्रामविकास अधिकारी आमडदे) ,  धनराज पाटील (ग्रामसेवक लोण), आनंदा पाटील (ग्रामसेवक पिंपळगाव),  पिचर्डे सरपंच किरणबाई भारत वैराळे, स्वाती पाटील (उपसरपंच पिचर्डे)  वंदनाबाई महाजन (भाजपा महिला आघाडी सरचिटणीस भडगाव)  शिवसेना महिला आघाडीच्या सिमाबाई पाटील, विजय महाजन (माजीउपसरपंच पिचर्डे),  दीपक महाजन ग्रामपंचायत सदस्य पिचर्डे,  मधुकर बोरसे ग्रामपंचायत सदस्य पिचर्डे ,  जगदीश  पाटील पिचर्डे ग्रा.सदस्य, कलाबाई बोरसे ग्रा.प.सदस्य पिचर्डे, अलकाबाई पाटील ग्रामपंचायत सदस्य पिचर्डे , विनोद बोरसे माजी उपसरपंच पिचर्डे , हेमराज महाजन पोलीस पाटील पिचर्डे, किशोर पाटील भाजपा बूथ प्रमुख पिचर्डे,  प्रकाश महाजन भाजपा पिचर्डे,  सुनील  पाटील भाजपा सरचिटणीस पिचर्डे, भास्कर भिमराव पाटील सरपंच बात्सर भारत नाना वैराळे. पिचर्डे भूषण पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष भडगाव,सागर  पाटील  भाजपा शाखाध्यक्ष पिचर्डे  यांचेसह आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here