विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे कार्य जिल्हात अव्वल असल्याचे मत सोयगाव पोलीस ठाण्यात चे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ साहेब यांनी म्हटले होते,याच स्वप्नपूर्ती फाउंडेशन ने आज 500 रूग्णांचे मोफत मोतिबिंदू आँपरेशन यशस्वी रित्या संपन्न करून तालुक्यातील गरजु व गरीब रुग्णाला एक हात मदतीचा दिला आहे.. स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी नुकतीच या संदर्भात माहिती देत तालुक्यातील पञकार बांधवांचे आभार व्यक्त केले.सोयगाव तालुक्यातील किन्ही शिंदोळ,वडगाव,जरंडी बनोटी इ.ठिकाणी भव्य नेञतपासणी शिबीर आयोजित करत मोफत आँपरेशन करणारी ही सोयगाव तालुक्यातील पहीली संस्था आहे तसेच रक्तदान शिबीरे व आरोग्य शिबीर यांच्या माध्यमातून अनेक समाजातील गरजु व गरीब व्यक्तीला मदत करत असतात. आँपरेशन साठी रूग़्णवाहिका व राहण्याची तसेच जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाते.शिक्षण आरोग्य बेरोजगारी व व्यसनमुक्ती या चार मुद्यावर स्वप्नपूर्ती फाउंडेशन काम करते, फाउंडेशन चे अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिबीरे आयोजित करण्यात येत असतात यामध्ये विशेष टिम कार्यरत आहे. या संपूर्ण फाउंडेशन ची जबाबदारी संस्थापक उपाध्यक्ष संदीप जाधव,सुरज सपकाळ, समाधान भुमे,शिवाजी पाटील,सोनाली सोनवणे,रामचंद्र माने,किशोर बारबैले,शुभम दाभाडे,चंद्रकांत सपकाळ,डाँ.संकेत गाडेकर,सकाहरी वाडेकर,जगदीश सोनवणे,दिपक राऊतराय,शेख शकील इ.पदाधिकारी परीश्रम घेत आहे.