यावल : प्रतिनिधी
यावल शहराचा आठवडे बाजार दर शुक्रवारी असतो आठवडे बाजाराची मोठी वर्दळ आणि लहान,मोठे दुकानदार,हॉटेल व्यवसायिक, भाजीपाला, मास, मच्छी ,चिकन व इतर अनेक वस्तूची विक्री करणारे दुकानदार आणि ग्राहक संगनमताने प्लास्टिक पिशवी,थैलीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत असल्यामुळे प्लास्टिकचा वापर पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने मानवास आणि पशुपक्षी यांना मोठ्या प्रमाणात हानिकारक असल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी आपल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत आठवडे बाजारातील व्यवसायिकांना आणि यावल शहरातील सर्व स्तरातील विक्रेत्यांच्या दुकानदारांच्या प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याकडील प्लास्टिकच्या 20 किलो प्लॅस्टिक थैल्या जमा केल्या आणि यापुढे दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या थैल्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या.
शासनाच्या आदेशानुसार, नियमानुसार 20 मायक्रोपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यापेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या,थैल्या ग्लास इत्यादी वस्तू यावल नगरपालिकेच्या पथकाने जप्त केल्या,या केलेल्या कारवाईत बारी वाडा चौक,बुरूज चौक,आठवडे बाजार,भुसावळ टी पॉइंट इत्यादी परिसरात नगरपालिकेतर्फे कारवाई करून यापुढे दुकानात प्लॅस्टिक थैल्या आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या.
तसेच यापुढे प्लास्टिक थैल्या आढळून आल्यास दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी म्हणून असे यांनी दिली.