ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

0
15

जळगाव : प्रतिनिधी
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवारी (30 एप्रिल) वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी व जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी सुरू राहतील. या उपलब्ध सुविधेसह वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणकडून करण्यात आले आहे.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल पवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. ुुु.ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे शक्य आहे. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here