Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वारकरी संप्रदायाचा माणुसकी हाच धर्म : ना. गुलाबराव पाटील
    जळगाव

    वारकरी संप्रदायाचा माणुसकी हाच धर्म : ना. गुलाबराव पाटील

    SaimatBy SaimatApril 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी
    वारकरी संप्रदाय हा माणसात देव शोधतो. माणुसकी धर्म मानतो आणि सर्व जातींचा मेळा करुन गुण्यागोविंदाने नांदायचं शिक्षण देतो. तो सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे.  समाजाला याच प्रबोधनाची गरज आहे. ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था भविष्यात हेच काम करेल असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी  केले.

    भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गुलाबराव वाघ यांनी धरणगाव येथील हभप हिरालाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथे २०१७ पासून संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून तालुका व परिसरातील बालकांना वारकरी शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या ही संस्था धरणगाव येथील लोहार गल्ली परिसरात कार्यरत असून या संस्थेचे नियोजित जागा बालाजी नगर परिसरात अस्तित्वात आहे या नियोजित जागेत संस्थेची प्रशस्त इमारत उभी करण्याच्या मनोदय संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. हिरालाल महाराज यांचा पूर्ण होताना दिसत आहे. असे श्री.वाघ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

    ना. पाटील यांच्या हस्ते ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमीपुजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे महामंडलेश्‍वर हभप माधवानंद सरस्वती, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील, प्रा. सी. एस. पाटील, साहित्यिक प्रा. बी.एन. चौधरी, धानोरा सरपंच भगवान महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, सुरेश चौधरी, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, गुरूवर्य आर.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हभप सदाशीव महाराज, कैलास महाराज टाकरखेडा, ज्ञानेश्वर महाराज पाळधी, अरुण महाराज पिंपळे, सुखदेव महाराज, सागर महाराज भवरखेडा, नाना महाराज, अनिल महाराज, उपनगराध्यक्ष विलास महाजन माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, हरीश मामा डेडिया, कमलेश तिवारी, निंबाजी महाजन, व्ही. टी. माळी, धिरेंद्र पुरभे, विजय महाजन, सोमनाथ महाजन, नारायण माळी, पत्रकार जितेंद्र महाजन, बाळासाहेब जाधव, हभप आर डी महाजन, के.आर. महाजन, बी.आर. महाजन, विनोद रोकडे, पी.डी.पाटील, राजेंद्र वाघ यांच्यासह सावता महाराज भजनी मंडळ, संत-महंत, किर्तनकार, महिला भगिनी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    भूमिपूजन सोहळा प्रसंगी ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सिनेट सदस्य पाटील शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व ह.भ.प. हिरालाल महाराज यांच्या हस्ते नुकतेच माहिती अधिकार कायदा महासंघाच्या (आरटीआय) जिल्हाध्यक्षपदी व धरणगाव पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आबासाहेब राजेंद्र वाघ यांची निवड झाल्याबद्दल व  गुरूवर्य एस. डब्ल्यू. पाटील सर यांचा सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप प्रा.सी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्याने अतिशय प्रसन्न वातावरण निर्मित झाले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रूख्मीणीसह सर्व संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या मंगलमयी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील सर यांनी सुंदररीत्या केले. तर बाल प्रशिक्षणार्थी किर्तनकारांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. व उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष हभप हिरालाल महाराज यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : मतमोजणी केंद्रावर पत्रकारांवर पोलिसी दंडुकेशाही

    January 19, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    “जळगावमध्ये वाहतुकीला नवसंजीवनी! गिरणा नदीवर ७९ कोटींच्या नवीन बांभोरी पुलाला मंजुरी”- खा स्मिता वाघ

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.