शामखेडे येथील युवकास विनयभंग प्रकरणी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

0
31
धरणगाव : प्रतिनिधी
शामखेडे तालुका धरणगाव येथील युवक  योगेश पांडुरंग सातपुते यास विनंयभंग प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा देण्यात आली
याबाबत सविस्तर वृत्त असे  कि शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते याने गावातीलच महिलेचा विनयभंग केला व जीवेनीशी मारण्याची धमकी दिली होती म्हणून धरणगाव न्यायालयात खटला भा.द.वि कलम 354,506 प्रमाणे सुरू होता सदरील खटल्यास फिर्यादी सह एकूण 10 साक्षीदार तपासण्यात येऊन आरोपी योगेश पांडुरंग सातपुते यास कलम 354 प्रमाणे तिन वर्ष शिक्षा व दहा हजार दंड तसेच कलम 506 प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड देण्याचे आदेश धरणगाव येथील न्यायमूर्ती श्री एस.डी.सावरकर यांनी निकाल दिला सदरील खटल्यात सरकारी वकील म्हणून श्रीमती अँड हटकर मॅडम व सदर कामी फिर्यादी महिलेतर्फे अँड रिषभ.एस.शुक्ला यांनी कामकाज पाहिले विशेष म्हणजे सदरील खटल्यात आरोपी हा गुन्हा घडल्यापासून कारागृहात आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here