नगरपालिकेच्या कामावर ठेकेदाराकडून घरमालका मार्फत वीज चोरी ?

0
10
यावल : प्रतिनिधी 
यावल शहरात विकसित भागात व्यास नगरमधील खुल्या जागेवर यावल नगरपालिकेचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी संबंधित ठेकेदाराने एका घरमालका मार्फत घरगुती वापराची अनधिकृत वीज आपल्या ठेकेदारी साठी वापरून वीजचोरी केल्याने यावल येथील वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की व्यास नगरमधील खुल्या जागेवर गेल्या सहा-सात महिन्यापासून यावल नगरपालिके तर्फे एक ठेकेदार बांधकाम करीत आहे या बांधकामाच्या ठिकाणी विविध कामासाठी वीज पुरवठा आवश्यक असतो या कामावर संबंधित ठेकेदार बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिक तारांवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेत असल्याची व्यासनगर मधील परिसरात बोलले जात होते आणि आहे.तसेच वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने वीज पुरवठा मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून डिमांड नोट भरण्यासाठी कागदपत्र सुद्धा घेतले होते परंतु त्या डिमांड नोटची रक्कम ठेकेदाराने वीज वितरण कंपनीकडे भरणा केली नसल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दिला नव्हता.विज बिल वाचविण्यासाठी आणि कमी खर्च व्हावा म्हणून ठेकेदाराने हुशारीने कामाच्या बाजूस असलेल्या एका घर मालकाकडून अनधिकृतपणे घरगुती वापराचा विज वीज पुरवठा बेकायदा घेतला होता याची माहिती वीज वितरण कंपनीला मिळाल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दि.19रोजी कारवाई करून घरमालकांकडून दंडात्मक पद्धतीने विज बिल वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे, ठेकेदाराने आपल्या उद्योगासाठी व्यवसायासाठी घरगुती वापराची वीज वापरली असली तरी वीज वितरण कंपनी कमर्शियल दराने दंडात्मक कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे या कार्यवाही मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदार रात्री-बेरात्री गौण खनिज बेकायदा संशयास्पद रित्या आणीत असल्याने सुद्धा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here