यावल : प्रतिनिधी
दि.20 एप्रिल2022 बुधवार रोजी डॉ.कुंदनदादा फेगडे यांच्या संपर्क कार्यालयात लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांची असंघटीत कामगारांसाठी असलेली महत्वाकांक्षी जनकल्याणकारी योजना ई -श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे कामगार पंधर वाड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जळगाव यांनी आयोजित केले होते. सदर अभियानाला डॉ.कुंदन फेगडे यांचे सहकार्याने यावल शहरात राबविण्यात आले.
या उपक्रमात यावल शहरातील नागरिकांनी लाभ घेतला.नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता श्रमजीवी कुटुंबास ई -श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियान घेण्यात आले. या अभियानास एकूण 187 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या वेळी अभियानाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजयभाऊ मोरे होते,या प्रसंगी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष विजय मोरे,यावल तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे तालुका सरचिटणीस विलास चौधरी डॉ.कुंदन फेगडे,अतुल भालेराव,भूषण फेगडे,यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी,उपाध्यक्ष मनोज बारी,शेखर बाविस्कर,यावल शहर युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धांत घारू, प्रथमेश घोडके,सागर लोहार, विशाल बारी,दिपक फेगडे,शुभम सोनवणे,चेतन कापुरे,आदींची उपस्थिती होती.