लोणार/गुलाब शेख
लोणार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती 22/03/2022 ती 19/4/ 2022 पर्यंत आहे जवळपास एक महिना बंद आहे या सर्व गलथान कारभाराला बाजार समितीचे संचालक मंडळ जबाबदार आहे असा आरोप भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी केला आहे,एका महिन्यापासून बंद असलेले बाजार समिती 19/4/2022 ला सुरू करण्यात आली परंतु काही तासानंतर लगेच खरेदीदाराने खरेदी बंद केली या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे खरीप हंगामाच्या अगोदर शेती मशागतीसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना आपला शेतमाल मार्केटमध्ये विकण्याशिवाय पर्याय राहत नाही परंतु अशा वेळेसच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे ? सर्व कारभाराला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळ जबाबदार आहेत,मागील 20 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना सुद्धा संचालक मंडळाच्या हाकेखोर पणामुळे बिबी,सुलतानपूर येथील उपबाजार समिती बंद पडल्या असून तेथील शेतकऱ्यांना लोणार किंवा मेहकर येथे आपला शेतमाल विकण्यासाठी घेऊन जावे लागत आहे यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे,याच अनुषंगाने लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू न केल्यास सुलतानपूर व बिबी प्रमाणे लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्याच दिशेने वाटचाल करत आहे असे दिसते.शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषीउत्पन्न बाजार समिती मध्ये अद्यापही शेतकऱ्यांसाठी निवारा,पिण्यासाठी पाणी व स्वच्छतागृह यापैकी कुठल्याही सुविधा नाही.
शेतकऱ्याच्या मालाची लवकरात लवकर हराशी करून योग्य भावात खरेदी करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी निवेदन तहसीलदारांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष गजानन मापारी, ज्येष्ठ नेते विजय मापारी, भगवानराव सानप,प्रकाश महाराज मुंडे,प्रकाश नागरे, उद्धव आटोळे व अन्य शेतकरी हजर होते.