जळगाव ः परेश बर्हाटे
पोलीस गाड्यांचा सायरन तसेच रुग्णवाहिकांचे सायरन म्हणजे आपत्कालीन बिगुल (घंटा) समजली जात असतांना त्यांचा म्हणजे सायरन चा उठसुठ वापर एक गम्मत म्हटली जात आहे वास्तवात जेव्हा पोलीस गाडीत वरिष्ठ अधिकारी असतात व त्यांना वाहनाद्वारे महत्वाच्या ठिकाणी जायचे असेल त्यावेळी तसेच रुग्णवाहिकेत गंभीर अवस्थेतील रुग्ण आहे व त्यासउपचारार्थ तातडीने उपचारार्थ रुग्णालयात नेणे अनिवार्य असते तेव्हा रस्ते मोकळे करणे व वाहतूक सुरळीत करण्याकरिता सायरन महत्वाचा ठरतो.
जळगाव शहरात मात्र पोलीस वाहनात कोणतेच वरिष्ठ अधिकारी नसतांना ,ठाणे निरीक्षक नसतांना आणि त्याचप्रमाणे बर्याच रुग्णवाहिकेत कोणतेच रुग्ण नसतांना अर्थात फक्त चालक असतांना सायरनवाजविले जात असल्याचे दिसून येते.लोक किंवा वाहनधारक त्या सायरनचा सन्मान करतात,वाट मोकळी करून देतात .परंतु जेव्हा एखाद्या पोलीस गाडीत अधिकारी नसल्याचे तसेच रुग्णवाहिकेत रुग्ण नसतांना वायफळ ‘सायरन’ वाजविला जात असल्याचे दिसते तेव्हा आपसूकच लोकांच्या तोंडून अपशब्द निघतात.
शहरात अशाचप्रकारे वाहतूक शाखेची जीप शास्त्री टॉवर ते भिलपुरा पोलीस चौकी,घाणेकर चौक, सुभाष चौक.शिवाजी रोड परिसरात सायरन वाजवीत फिरस्ती करीत असते.त्या वाहतूक शाखेच्या वाहनाचे समजू शकते.त्यातील वाहतूक पोलीस वाहतूक व गर्दी नियंत्रित करण्याचे काम करतात. पण अन्य पोलीस गाड्या ज्यामध्ये निरीक्षक किंवा कोणतेच अधिकारी नसतात, असतो फक्त चालक.तरीही सुभाष चौक,साने गुरुजी चौक आदी परिसरातून मार्गक्रमण करतांना ते अनावश्यक सायरन वाजवीत चालतात .
बर्याच रुग्णवाहिकेत रुग्ण नसतांना सायरन वाजविण्याची पद्धत झाली आहे.लोकांना दचकविणे ,आपला मार्ग मोकळा करून घेणे हा त्यांचा उद्देश असू शकतो. अशाप्रकारे नियमभंग करणार्या पोलीस असो की रुग्णवाहिकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आहे.सायरन चा लोकात एक सन्मान आहे .तो कायम राहायला हवा.विनाकारण जर कोणी वाजवीत असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे.असेच चालत राहिले तर खरोखरीच अधिकारी असलेल्या पोलीस वाहनाने व रुग्ण असणार्या रुग्णवाहिकेने कितीही सायरन वाजविले तर लोक -वाहनधारक वाट मोकळी करून देणार नाहीत इतके निश्चित म्हटले जाते.