जळगावात सुरज आणि सेजलचा आदर्श विवाह सोहळा

0
16

जळगाव प्रतिनिधी : जळगावात सुरज व सेजल नारखेडे याचा आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे. पर्यावरणाची साvतत्याने होत असलेले ऱ्हास आणि घडणारे दुष्परिणाम याला अटकाव देण्यासाठी नवं दपत्यांकडून विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे जगवावी आणि पर्यावरणाचे सवरक्षण व्हावे म्हणून झाडाची रोपटे भेट देण्यात आली आहे.

सूरज व सेजल हे नवं दांपत्य उच्चशिक्षित असून परिवाराची राजकीय पार्श्वभूमी आहे. मात्र विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण पूरक संदेश देणारा हा विवाह सोहळा जळगावात पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात राजकीय नेत्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी दिसून आली.

या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना भेट देण्यात आलेली झाडे सुरज व सेजल या नवं दापत्यांकडून जगवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणे करून सातत्याने होणारी पर्यावरणाची विनाशकारी हानी झाडे जगल्यास रोखता येणार आहे. पर्यावरण पूरक संदेश देणारा आदर्श विवाह सोहळ्याची शहरात चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here