ठाणे : प्रतिनिधी
कोल्हापूरमधील पोटनिडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला, तर भाजपचा पराभव झाला. यावर अनेक नेटकऱ्यांनी ‘चंद्रकांत पाटील हिमालयात जा’ अशी खोडसाळ टिप्पणी केली आहे.
त्यावरच आता गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चंद्रकांत पाटील हे हिमालयात पोहोचले असल्याचा एडिटेड फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं लिहिलेलं आहे. तर आव्हाड यांनी “नको परत या…” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.