डीपीवर धडकले कंटेनर : चालक जागीच ठार

0
50

जळगाव : प्रतिनिधी
खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कंटेनर रिव्हर्स घेतांना चालकाचा अंदाज चुकल्याने कंटेनर डीपीला धडकला या घटनेत विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने आज सकाळी गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून संबंधीत चालकाचा मृतदेह जिल्हा सामांन्य रूग्णालात पाठविण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पंचनामा सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here