Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात, ट्रॅक्टरला धडकली कार
    राज्य

    कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात, ट्रॅक्टरला धडकली कार

    SaimatBy SaimatApril 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जाताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ आदळली. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या चारचाकी वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.

    एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.

    जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अपघात स्थळावरून इंदुरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी इथं पोहचवण्यात आलं. या ठिकाणी त्यांचं कीर्तन नियोजित वेळेत पार पडलं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.