जळगांव प्रतिनिधी
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा फेगडे, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. संध्या अट्रावलकर आदी मान्यवर व्यासपीठावर आमंत्रित होते. व्यासपीठावरील पाहुण्यांनी श्रद्धापूर्वक नतमस्तक होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आणि भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात शोभा फेगडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने उपस्थित शिक्षकांना व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. व डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार व बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असा मौलिक संदेश व विचार त्यांनी विचार मंचावरून व्यक्त केला.
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय प्रेमचंद जी ओसवाल यांनी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करताना संबोधित केले की ,भारतीयांनी उद्देशिकेचे तंतोतंत पालन केल्यास देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष व लोकशाहीप्रधान देश राहिल. आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता नांदेल. तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंगलाताई दुनाखे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना जयंतीनिमित्त सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या .आपल्या संदेशात त्यांनी आपले विचार व्यक्त केले की क्रांतीसुर्य महाज्ञानी युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ,त्यांचे कार्य ,लोकांपर्यंत घेऊन जा व लोकांना पटवून द्या. भारतासाठी त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे .आपण त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांनी जयंतीनिमित्त कोटी -कोटी प्रणाम करून सदिच्छा व शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जसे उच्च शिक्षण घेतले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे आचरण अंगीकारल्यास स्वतःचा उत्कर्ष करून घेता येईल. आपला विकास झाला की ,समाजाचा विकास होतो आणि समाजाचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होतो. आपली परिस्थिती आपल्या हातात असून ती बदलण्याची धमक आपल्या मनगटात असली पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर सुभाष सिरसाठ सर,अविदीप पवार मिस। या मान्यवरांची भाषणे झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून समारोप करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.विजया गजभिये यांनी केले तर आभार मनोज भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले.