शिरसगाव येथे स्कूल किटचे वाटप सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

0
43
चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून व मदतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत ज्यामध्ये जलसंधारण, आरोग्य शिक्षण तसेच रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे परिपूर्ण असे स्कूल किट तालुक्यातील  शाळांमध्ये वाटप करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिरसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सेवा सहयोगचे गुणवंतदादा सोनवणे यांनी सांगितले की,आपण समाजाचं एक देण लागतो ही भावना बालपनापासून  निर्माण झाली पाहिजे.आपल्यापासून लोकांना काही फायदा होऊ शकतो का?तसेच आचरण आपले असावे.शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची फक्त शिक्षकांचीच जबाबदारी नसून पालकांची तसेच संपुर्ण गावाचीही आहे.
गावाचा विकास साधायचा असेल तर लोकसहभाग अत्यंत गरजेचा आहे.
सेवा सहयोग फाऊंडेशनचे माध्यमातून  पर्यावरण रक्षणासाठीही विविध उपक्रम जसे जलसंधारण,निसर्ग टेकडी प्रकल्प,एक गाव एक लायब्ररी,एक गाव एक तलाव,तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना आँक्सिजन बेड,आँक्सिजन सिलेंडर,व मल्टीपँरामिटर इ.साहित्य दिले आहेत.तसेच सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत उपजिविका निर्मिती कुशल रोजगार उपक्रमही राबविण्यात येत आहेत.याप्रसंगी सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे प्रशांत सोनवणे, दयाराम सोनवणे,सोमनाथ माळी,राहूल राठोड,पंकज राठोड, मधुकर भीमराव पाटील (रिटायर शिक्षक), अमोल गोरखनाथ चव्हाण, (सरचिटणीस भाजपा),भीमराव साहेबराव चव्हाण (सरपंच),दिगंबर पंडित देवरे,विजय केशव चव्हाण, भालचंद्र महारु पाटील,सुर्यकांत चव्हाण,संजय बिराडे,पुरुषोत्तम चव्हाण,दशरथ चव्हाण,प्रकाश पाटील (शालेय समिती अध्यक्ष),प्रशांत चव्हाण तसेच शाळेचे शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here