Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन
    जळगाव

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन

    SaimatBy SaimatApril 13, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी 
    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन  करण्यात आले आहे.
    या अभिवादन सभेस संबोधित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास जिल्हाधिकारी  अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी महापौर ललित कोल्हे,राजेश झाल्टे, उपायुक्त विद्याताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तरी या अभिवादन सभेत जळगाव शहरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

    शहर जयंती उत्सव समितीतर्फे स्टेशन परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली त्याचबरोबर शहरातील विविध भागातील प्रमुख मार्गावर व चौका-चौकात निळे झेंडे लावले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेसह मौलिक व दिशादर्शक विचारांचे बॅनर लावण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित चित्रप्रदर्शन लावण्यात आलेली आहे.
    सायंकाळी पाच वाजेपासून विविधि आंबेडकरी मंडळाच्या मिरवणूक सुभाष चौकातून प्रारंभ होणार असून, गांधी मार्केट, टावर चौक, महापालिका, नेहरू चौक, रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे.

     

    मिरवणुकीच्या मार्गावर उत्कृष्ट प्रबोधनात्मक आरास करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंडळाचे स्वागत व सन्मानचिन्ह प्रधान करण्यासाठी मार्गावर स्टेज उभारण्यात आलेले आहे. त्यामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
    सदर जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुकूंद सपकाळे, गणेश पगारे,पंकज सोनवणे, सोनू अधाळे, दिलीप सपकाळे, अनिल अडकमोल, अमोल कोल्हे,माजी नगरसेवक राजू मोरे, नगरसेवक सुरेश सोनवणे, संजय सपकाळे,राधे भाऊ शिरसाठ, भारत सोनवणे,मिलिंद सोनवणे, आनंदा तायडे, वाल्मीक सपकाळे, रमेश सोनवणे, नितीन अहिरे, विकी सोनवणे, प्रवीण वाघ आदींसह परिश्रम घेत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026

    Varangaon : वरणगाव रस्त्यावर मालवाहू गाडी जळून खाक

    March 23, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.