यावल (सुरेश पाटील)
तालुक्यातील सातपुडा डोंगरात अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावातील एका आदीवासी अविवाहीत तरुणीला विषारी सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.या संदर्भात सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गाडऱ्या तालुका यावल या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या फुगली भाया बारेला ही22 वर्ष ही तरूणी काल दि.12 एप्रील रोजी आपल्या कुटुंबा सोबत गाडऱ्या शिवारातील आपल्या शेतात सकाळी9ते 9:30च्या सुमारास तुर कापणीचे काम करीत असतांना अचानक एका विषारी सर्याने तिच्या उजव्या हातावर दंश केला,सदर दंश करणारा साप हा अत्यंत विषारी असल्याने त्या तरूणीचा जागेवर मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.सदरची तरूणीला सर्पदंश झाल्याची माहीती मिळताच गावातील सरपंच भरत छ्तरसिंग बारेला पोलीस पाटील तेरसिंग गाठु बारेला व ग्रामस्थांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या तरुणीचा जागीच मृत्यु झाल्याचे दिसुन आले.
यावेळी सरपंच आणी पोलीस पाटील यांनी वेळेवर रूग्णवाहीका मिळुन शकल्याने सुमारे सहा तासाचे प्रवासाच्या 80 किलोमिटरचा अंतरावरून एका खाजगी वाहनाने त्या मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन,या संदर्भात पोलिस पाटील तेरसिंग बारेला यांनी पोलीसांना खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व पोलीस करीत आहे.मरण पावलेल्या तरूणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी यांनी केले.