जामनेर(प्रतिनिधी): – आदर्श राजा व आज्ञाधारक पुत्र असावा तर श्री रामा सारखा, केवळ वडिलांनी दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी श्री रामाने राज सिंहासनाचा व कौटुंबिक सुखाचा त्याग केला. अशा प्रभू रामाचा सर्वानी आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन धुळे येथील नीलाताई रानडे यांनी येथे आयोजित रामायण कथा वाचन प्रसंगी केले.
ब्राह्मण संघाकडून येथील दत्त मंदिरात कथा वाचन कार्यक्रम घेण्यात आला. यांचे स्वागत संगीत कुलकर्णी यांनी केले. पतिव्रता सीतेसारखी असावी, तर भाऊ लक्ष्मण व भरत सारखे असावे हे रामायणातून दिसून येते. रामायण हा केवळ ग्रंथ नाही, तर विचार आहे, असेही रानडे यांनी सांगितले.ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ नरेंद्र कुलकर्णी यांनीप्रास्ताविक केले. प्रा.सुधीर साठे यांनी आभार मानले. सलग ९ दिवस कथा वाचन झाले. यावेळी महिला पुरुष भाविकांची मोठी उपस्थिती होती.