लोणार (गुलाब शेख)
लोणार पोलीस ठाण्यात आज , ९ एप्रिल रोजी सकाळी शांतता समितीची सभा झाली पुढील काही दिवसांत येणारे सर्वधर्मीय सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करावे . सण – उत्सवांच्या मिरवणूकीत दारू पिऊन धिंगाणा करणारे तसेच शांतता भंग करणाऱ्यांची पोलीस गय करणार नाहीत अशा सूचना लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी दिल्या . लोणार शहरात आधी ज्या जुन्या मार्गांनी मिरवणूक निघत होती त्याच मार्गाने यंदाही मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येईल . डिजेला परवानगी राहणार नाही मात्र पारंपरिक वाद्यांना परवानगी राहील . रामनवमी , महात्मा फुले जयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त निघणारी मिरवणूक वेळेत काढावी व वेळेत संपवावी . मिरवणुकीत कुणी दारू पिऊन मस्ती करणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी असे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी सांगितले सभेच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार प्रदीप ठाकूर हे होते , तर प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपालिकेचे उपाध्यक्ष बादशाह खान , साहेबराव पाटोळे , गजानन खरात , पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद , विजू मापारी , भारत राठोड आदी होते
व या सभेचे संचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले . यावेळी रामनवमी आयोजक बाबा साहेब आंबेडकर जयंतीचे खेड्यावरचे प्रतिनिधी , महावीर जयंतीचे ऊत्सव समितीचे सदस्य व इतर बाकी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते