वळसे-पाटील यांची गृहमंत्री पदावरून उचलबांगडी? पवारांनी-मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावले

0
20

मुंबई : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटीच्या संतप्त संपकरी कर्मचाऱ्यांनी धडक दिली. त्यांनी शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले, पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवासस्थानाच्या दिशेने चापलाही भिरकावल्या. या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता एक मोठी माहिती पुढे येत आहे. शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना बोलवून घेतले होते. यावेळी शरद पवारांनी आंदोलनासंदर्भातील संपूर्ण माहिती त्यांच्यकडून मागवून घेतली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वळसे पाटलांना भेटण्यासाठी बोलवले आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांमध्ये बैठक सुरू असून, दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्री पदावरून उलचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात हे.

 

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल ‘सिल्व्हर ओक’ हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्य सरकार आणि पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. कालचे झालेले आंदोलन हे गृहखाते संभाळणाऱ्या वळसे-पाटील यांचे अपयश असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. तर उपमुख्यमंत्री यांनीही विरोधकांच्या सुरात सूर ओढला. अशातच आज माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारने बुळबुळीत भूमिका घेणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

 

त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार यांनी तातडीने गृहमंत्री वळसे-पाटील यांना बोलावून घेतले आणि संपूर्ण माहिती त्यांच्यकडून जाणून घेतली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनीही त्यांना बोलावून घेतले. दरम्यान, यात पोलीस खात्याचे अपयश असल्याची खातरजमा झाली तर शरद पवार वळसे पाटील यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here