यावल (सुरेश पाटील)
माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार तसेच दिलेल्या तक्रारीची संबंधितांनी चौकशी करून सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन तसेच पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रकरणाची तत्काळ दखल घेत पाचोरा पीपल्स बँकेची दहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधक तथा पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाडवी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पाचोरा पीपल्स बँकेचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी,समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा चालक(पांडव नगर,आदर्श नगर जळगाव) आणि कपिल प्रिंटर्स संचालक विलास जोगेंद्र बेंडाळे रा.जळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची संशयित आरोपीतांची नावे आहेत.
पाचोरा पीपल्स बँकेच्या सन 2011-12 ते 2015-16 या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रताप पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली होती वरील तीनही जणांनी संगनमताने बनावट बिले सादर केली आणि निवडणूक खर्चासाठी दहा लाख वीस हजाराची रक्कम काढून पाचोरा पीपल्स बँकेची फसवणूक केली.
यात कपिल प्रिंटर्सच्या नावाने 2 लाख 68 हजार 425,समर्थ टूर्स नावाने 40हजार,
पाचोरा येथील सु.भा.पाटील शाळेच्या इमारत भाड्यापोटी 62 हजार रुपयांचे बनावट बिले सादर करण्यात आली होती आणि आहेत.याप्रकरणी एअरपोर्ट रोड पुणे येथील राहणार तथा आरटीआय कार्यकर्ते पंकज श्रावण सोनार यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, त्यावरून पाचोरा पोलिसात वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे तपास करीत आहेत.



