चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला हा निधी राजभवनात जमा न केल्याची माहिती समोर येत असल्याने किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
भाजपचे किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला निधीच काय झालं असा सवाल करीत सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला जमा न करता त्या पैशाचा स्वतःच्या कामासाठी खर्च केल्याचा आरोप शिवसेना युवासेनेने केला. किरीट सोमय्याने देशवासियांचा विश्वास घात करीत देशाची गद्दारी केल्याने किरीट सोमय्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका शिवसेनेने निवेदनात केली आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक सोयगाव संतोष बोडखे,युवासेना शहर प्रमुख अमोल मापारी,नगरसेवक दिपक पगारे, लतिफ शहा,अशोक खेडकर,भगवान जोहरे तसेच राजू दुतोंडे, शरीफ शहा, शेख जावेद,भगवान वारंगणे, अय्युब पठाण आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.