मलकापूर प्रतिनिधी सतीश ढांगे
मलकापूर 5/4/22येथील बौद्ध युवकास जातिवाद्यांनी जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करीत चार चाकी वाहनांची केली तोडफोड ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपी अद्याप मोकाट…
सविस्तर असे की
पंतनगर येथे बौद्ध समाजातील संघर्ष आत्माराम सुरडकर वय 37 याला मयूर होंबे वय 25 रा. शिवाजीनगर व कार्तिक हांडगे वय 30 वर्ष रा. सावजी फेल मलकापूर यांनी विष्णू इंगळे रा. कुंड याच्या फोनवरून फोन केला व त्यावरून मयूर होंबे हा मला म्हणाला की तुझ्या फायद्याचं काम आहे तू लवकर जगू मामाच्या धाब्यावर ये यावरून मी घरून 7:30 च्या सुमारास जग्गू मामा च्या धाब्यावर गेलो असता तेथे जातीवादी मयूर होंबे व कार्तिक हांडगे हे दोघे बियर पीत होते तेव्हा मयूर होंबे हा मला म्हणाला की तू जास्त माजला काय तुझ्या जवळ जास्त पैसा आला म्हार्ड्या तुमची मस्ती जिरवतो जर पुन्हा हॉटेल जवळ दिसला तर तुला घरी येऊन खतम करू व यानंतर त्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केली यामध्ये मानेला जखम झाली आहे तसेच माझ्या चारचाकी वाहनाचा देखील दरवाजा तोडला यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
संघर्ष सुरडकर याला मारहाण करत असतांना जग्गू मामा हॉटेलचे मालक जगन्नाथ इंगळे यांनी त्यापासून सावरासावर केली
तर याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली असता ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार विविध प्रकारचे गुन्हे दाखल होऊन आरोपी अद्याप मोकाट आहे.