सोयगाव पोलीस ठाण्यात शांतता कमेटी बैठक संपन्न….

0
58

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने सोयगाव पोलीस ठाण्यात बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली यावेळी उपविभागीय पोलीसाधिकारी विजयकुमार मराठे यांनी भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांततेचे आवाहन करून मिरवणुकीचा मार्ग ठरविण्यात यावा तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी बैठकीत केले.

पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मार्गदर्शन करून पोलिसांच्या पाठीशी रहा असे आवाहन शहरवासीयांना केले यावेळी उत्सव समिती अध्यक्ष हर्शल काळे,उपाध्यक्ष अंकुश पगारे,राजू दुतोंडे,नगरसेवक दीपक पगारे,अजित काळे,अनिल गोतमारे,विजय चौधरी,साहेबराव सोनवणे,भास्कर श्रीखंडे,विलास नेरपगारे,राजू काळे,आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.उपनिरीक्षक सतीश पंडित,गणेश रोकडे,सागर गायकवाड,अजय कोळी,रवींद्र तायडे,कौतिक सपकाळ,ज्ञानेश्वर सरताले आदींनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here