जळगाव : प्रतिनिधी
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जल प्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना घोषित होईल का? असा सवाल उपस्थित केल्याने गिरणा काठाच्या शेतकऱ्यांच्या विकासाची मुहूर्तमेढ आरंभली असुन लोकसभेत गिरणाईचा आवाज गुंजला आहे. लोकसभेच्या पटलावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गिरणा माईच्या शाश्वत विकासाचा प्रश्न मांडण्यात आल्याने गिरणा खोऱ्यात खा. उन्मेश पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
लोकसभेच्या अधिवेशनात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गिरणा नदीच्या शाश्वत विकासासाठी एक पाऊल टाकीत गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या धर्तीवर गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर (कॉरिडॉर) निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे का ? असा सवाल उपस्थित केला. खा. उन्मेश पाटील यांनी एक जानेवारी पासुन गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत सुमारे चारशे किलोमीटर ची पाईप आज येत पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेत ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची सुसंवाद साधला असून गिरणा काठाच्या शाश्वत विकासाची विकासासाठी सोबत काम करण्याचे आवाहन करत आहे. याच अनुषंगाने आज खा. उन्मेश पाटील यांनी गिरणा माईच्या काठावर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून केंद्र सरकारने ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा केली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना राबविण्याची विनंती केली.
या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रींय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न बद्दल त्यांचे अभिनंदन करून माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे क्षेत्र व शेतकरी बांधवांची संख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून जैविक शेती, परंपरागत कृषी विकास योजना या महात्वाकांक्षी योजना शासन राबवित आहे. या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात नमामी गंगे प्रकल्पांतर्गत गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर करिता रक्कम रु.120 कोटी ची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच अधिकाधीक शेती क्षेत्राचा विकासाअंतर्गत देशातील अंदाजित 3819 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय/ नैसर्गिक शेती अंतर्गत अधिकाधीक शेती प्रमाणित करण्यात आलेली आहे. तसेच गिरणा नदी ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर) करिता व गिरणा नदी जल प्रदूषण मुक्त होण्याकरिता राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास या योजनेस मंजुरी देण्याची खात्री मंत्री कैलाश चौधरी यांनी दिली. यामुळे गिरणा काठाच्या शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गिरणा पुनरूज्जीवन अभियानाअंतर्गत गिरणा काठ अधिक समृद्ध होण्यासाठी किनाऱ्यावरील शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा आग्रह उन्मेश पाटील हे आपल्या गिरणा पदयात्रेतून करीत आहे. गिरणा परिक्रमेत आत्तापर्यंत हजारो ग्रामस्थ, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असा आग्रह धरला आहे. आज गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टरच्या केंद्र सरकारच्या मनोदयाने गिरणा काठाच्या समृद्धीचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारने प्रस्ताव पाठवताच गिरणा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर प्रत्यक्षात साकारला जाणार असल्याने एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
