Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»स्व.पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ १७ एप्रिल रोजी जलतरण स्पर्धा
    जळगाव

    स्व.पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ १७ एप्रिल रोजी जलतरण स्पर्धा

    SaimatBy SaimatApril 6, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 
    क्रिडा प्रकारातील एक अतिशय महत्वाचा क्रिडाप्रकार म्हणजे जलतरण होय .  या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब , होतकरू  आणि गुणी जलतरणपटूंना भरीव मदत  करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीज व  जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार   दि . १७ एप्रिल रोजी स्व. पि.व्ही. माळीदादा  स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत होणार आहेत.
    स्व. पी. व्ही. माळीदादा  यांनी जलतरण प्रकार तसेच विविध नामांकित जलतरणपटू घडविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. सुमारे तीस -बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रुजविणारे ते जळगावातील पहिले प्रशिक्षक होय. १९९४ साली जळगावात पहिल्यांदा माळीदादांच्या नेतृत्वात राज्य नामांकन जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जळगावातील मेहरूण येथील कै . कोकीळगुरुजी जलतरण उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. या तलावासंदर्भातील सोयीसुविधा संदर्भातील बाबींसाठी त्यांनी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या घरावर काढलेला स्विमिंग कॉस्च्युम मोर्चा हा ऐतिहासिक ठरला होता .
    जळगावातील होतकरू क्रिडापटूंसाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांसाठी त्यांनी वेळोवेळी मदतही उपलब्ध करून दिली. जळगावात खेळाडूंसाठी प्रथमतः दत्तक योजनेचे संकल्पना त्यांनीच आणली .  कमलेश नगरकर, राहूल रनाळकर ,प्राची मोघे ,पियुष श्राफ ,  मिलिंद बाविस्कर यांसारखे असंख्य जलतरणपटू माळीदादांनी घडविले ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भरीव कामगिरीची चमक दाखविली. शिवाय माळीदादांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा संचालक म्हणून  सुमारे २५ वर्षे त्यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळली.
    स्व. पि. व्ही . माळीदादांच्या  जलतरण क्षेत्रातील या अनमोल योगदानामुळेच त्यांच्या पुण्य स्मरणार्थ दि . १७ एप्रिल रोजी सदरील  भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ५ वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणार  आहे. १) गट -१-( स्त्री व पुरुष ) –फ्री स्टाईल -५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक –५० मी.  २) गट -२ –( मुले व मुली वय -१५ ते १७ वर्षे )  –फ्री स्टाईल -५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक –५० मी.  तसेच -फ्री स्टाईल मिक्स रिले ४ बाय ५० मी.   ३) गट ३ ( मुले व मुली वय– १२ ते १४ वर्षे )  फ्री स्टाईल -५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक –५० मी.  तसेच -फ्री स्टाईल मिक्स रिले ४ बाय ५० मी  ४) गट –४ ( मुले व मुली वय– ११ ते १० वर्षे )  फ्री स्टाईल -५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक –५० मी.  तसेच -फ्री स्टाईल मिक्स रिले ४ बाय ५० मी  ५) गट -५ ( ९ वर्षाखालील मुले मुली  )  फ्री स्टाईल – २५ मी. ब्रेस्ट स्ट्रोक –२५ मी.  तसेच -फ्री स्टाईल मिक्स रिले ४ बाय ५० मीटर अशा विविध वयोगटात घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णतः मोफत असणार आहे. सहभागी जलतरणपटूंना टी -शर्ट ,सर्टिफिकेट ब्रेकफास्ट व लंच इत्यादी मोफत दिले जाणार आहे. तर विजेत्यांना मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ एप्रिल हि अंतिम दिनांक असून स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती व प्रवेशासाठी  कमलेश नगरकर मो. क्र. ९४२३४९१८०८ , व गायत्री येरपाल  मो. क्र . ७३९७८०३५७७  यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.