चाळीसगावात गुटख्याचा कंटेनर जप्त

0
43

चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगावात पोलीसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. सदर कंटेनरची अधिक तपासणी केली असता मध्ये गच्च गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान या कंटनेरमध्ये कदाचित एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here