दुचाकी अपघातात एक तरुण ठार

0
43

पहुर : प्रतिनिधी

जळगाव – औरंगाबाद महामार्गावर वाकोदजवळील सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट गाडी रोडाच्या बाजूला जाऊन पडल्याने गाडी चालक तरुण जागीच ठार झाला व मागे बसलेले दोन जण जखमी झाले आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘जळगाव येथुन गोसेगाव ता.सिल्लोड,जि. औरंगाबाद येथे बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेले जळगाव शिवाजी नगर येथील व्यंकटेश सुधाकर सपकाळे, करण भगत, धिरज सिरसाठ हे तिघेजण पेपर देऊन बुलेट या दुचाकीवर जळगावकडे परत येत होते. वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गाडी चालक विक्की उर्फ़ व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले करण व धिरज यांना हातापायाला मार लागल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here