लोणार ( गुलाब शेख )
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोरोना आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगीतले , त्यानुसार मयत व्यक्तीच्या वारसांनी ऑनलाईन अर्ज सुध्दा केले .परंतू आजपर्यंत दोन वर्ष उलटून सुध्दा शासनातर्फे कुठल्या प्रकारची मदत मयत व्यक्तीच्या वारसांना मिळालेली नाही . कोरोना आजारामुळे मयत पावलेले कुटूंब प्रमुख्य व्यक्तीच्याटूंबावर उपासमारीची वेळ आलेली असतांना सुध्दा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनातर्फे मिळाली नाही . मयत व्यक्तीच्या वारसांनी खूप प्रयत्न व कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन अर्ज केले होते परंतु आज पर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे . तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून लवकरात लवकर कोरोना आजाराने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार रु पंत्रास हजार रुपये आर्थिक मदत करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा आशयाचे निवेदन लोणार तालूका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ४ एप्रिल रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी
वंचित बहुजन आघाडीचे नेते संघपाल पनाड,अध्यक्ष फिरोज खा पठाण, उपाध्यक्ष शकीर पठाण, दिपक मोरे, विलास लहाने,लहानु मोरे, शशिकला सरदार,प्रयाग अंभोरे,मंदा मोरे सह पदाधिकारी उपस्थित होते.