यावल तालुक्यात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल कडून शिवसेना पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव.

0
7

यावल (सुरेश पाटील)

यावल तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल कडून शिवसेनेचा दारुण पराभव करण्यात आला यामुळे यावल तालुक्यातील एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत यावल तालुक्यात आणि जळगाव कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे निवडणुकीत त्या एका पदाधिकाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नडल्याचे बोलले जात आहे कारण विरावली विविध कार्यकारी सोसायटीत 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला तर फक्त दोन जागा शिवसेना पुरस्कृत पॅनलला मिळाल्या आहेत.
विरावली विकास सहकरी सोसायटीची निवडणूक सन 2021 ते 2026 या वर्षासाठी घेण्यात आली निवडणुकीत एकूण बारा जागांसाठी 39 फॉर्म भरले गेलेत यात छाननीच्या दिवशी विश्वनाथ पाटील यांच्या फॉर्मवर परिवर्तन पॅनल च्या वतीने अर्जदारांनी लेखी हरकत घेत तीन अपत्य असल्याने हरकत घेतली यावेळेला सुद्धा शिवसेनेला मोठा झटका बसला.या अर्जावर अर्जुन माणिक पाटील,गुलाब रघुनाथ पाटील, प्रल्हाद गोकुळ पाटील,गणेश अर्जुन पाटील, युवराज पंडित पाटील,बाजीराव माणिकराव पाटील,दिनकर भाऊराव पाटील,नरेंद्र दयाराम कोळी आदी उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तडवी यांच्याकडे लेखी हरकत घेतली.महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 अन्वये कलम 73 नुसार पोटकलम कलम 7 नुसार 2002 नंतर “तिसरे” अपत्य असल्याचे तीन ही अपत्यांचे जन्मदाखला,आधार कार्ड,जन्म नोंदणी च्या आरोग्य लसीकरण पत्र,प्रथम जन्म नोंदणी वैद्यकीय नोंद अशा प्रकारचे पुरावे सोबत जोडले होते या प्रसंगी अर्जदारांच्या वतीने ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांनी बाजू मांडली होती याच्या आधारे विरावली वि.का.सह सोसायटी काम पाहत असलेले निवडणूक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांनी विश्वनाथ धोंडू सिंग पाटील यांचा फॉर्म अवैध ठरवला होता. त्यावेळेस शिवसेनेच्या नियोजनाला मोठा झटका बसला होता अशा या मनमानी कारभाराचे परिणाम मतदानावर होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनल ला 12 पैकी दहा जागांवर बहुमत मिळाले असून शिवसेनेच्या वाट्यावर फक्त दोन आल्याने ग्रामीण स्तरावरील एका संस्थेत शिवसेनेचा दारुण पराभव झाला यामुळे आगामी निवडणुकां लक्षात घेता शिवसेनेच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here