महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना अंतर्गत कार्यरत प्रेरीकांचे संविधान चौकात बुधवार पासून बेमुदत आंदोलन सुरू…..

0
10

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला कर्मचारी प्रेरिका विविध मागण्यांसाठी संविधान चौकात अन्न जलत्याग आंदोलन सुरू करणार आहे तीन टप्प्यात होणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात बुधवारी स्थानिक संविधान चौकात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाने सुरुवात झाली आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवार ३ एप्रिल पासून अन्नत्याग करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करणे हा महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना मागील प्रमुख उद्देश आहे या योजनेच्या या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे यासाठी त्यांना प्रति महिना तीन हजार रुपये मानधन दिले जाते मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही त्यामुळे थकीत मानधनासाठी ३० मार्चपासून या महिला कर्मचाऱ्यांनी प्रेरीकांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. १० ते १२ महिन्यांचे थकीत मानधन सरसकट देण्यात यावे मानधनात वाढ करून धर्म हा दहा हजार रुपये मानधन द्यावे कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचा लाभ द्यावा रक्कम थेट खात्यात जमा करावी प्रेरीकांना ड्रेसकोड आणि ओळख पत्र देण्यात यावे या प्रमुख मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात येत आहे.

राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत संविधान चौक सोडणार नाही अशी भूमिका या महिला कर्मचाऱ्यांनी मानले आहे त्यांच्या जीवाला हानी झाल्यास संपूर्णपणे मुख्यमंत्री जबाबदार राहतील असेही आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here