विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
जरंडी(ता.सोयगाव)गावालगत असलेल्या शिवारातील गट क्रमांक-७५ मधील महावितरणचं ए-बी स्वीच मध्ये अचानक शोर्ट सर्किट झाल्याने तुटलेली मुख्य प्रवाहाची तार शेतात ज्वारीच्या शेतात कोसळल्याने दोन एकरातील रबीची काढणीवर आलेली ज्वारीचा कोळसा झाला आहे.या आगीच्या घटनेत १६ क्विंटल ज्वारीचा कोळसा झाला असून जनावरांसाठीचा चारही जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे ८० हजाराचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी महावितरणच्या वीज मंडळाने घटनेची प्राथमिक पाहणी केली आहे.
जरंडी ता.सोयगाव गावालगत चिंतामण देवाजी गोरे यांचे गट क्रमांक-७५ शेत आहे.या शेतकऱ्याने खरिपाच्या ज्वारीचे अतिव्रीष्टीमुळे उत्पन्न हाती न आल्याने पोटाच्या भाकरीसाठी रबी हंगामात दोन एकर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली होती.परंतु शेतातून निंबायती गावाकडे जाणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या ए-बी स्वीच मध्ये अचानक शोर्ट सर्किट झाल्याने मुख्य वीज वाहिनी तुटून ज्वारीच्या शेतात पडल्याने दोन एकरमधील काढणीवर आलेली १६ क्विंटल ज्वारीच्या पिकांचा कोळसा झाला असून जनावरांसाठीचा चाराही या आगीत भस्मसात झाला आहे.वीज वाहिनी तुटून शेतात पडताच अख्ख्या शेताला आगीने विळखा घातला होता परिसरात शेत मजूर व शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु पाण्याची उपलब्धता नसल्याने अखेरीस काढणीवर आलेली दोन एकरातील ज्वारीचा आगीत चक्क कोळसा झाला आहे.त्यासोबतच ज्वारीच्या चाऱ्याची राखरांगोळी झाली आहे.यामध्ये २० हजाराचा चारा आणि ६० हजार रुपयांची १६ क्विंटल ज्वारी भस्मसात झाली आहे.
कोट१)जरंडी ता.सोयगाव शेतातील आगीच्या घटनेची पाहणी केली आहे.संबंधित शेतकऱ्याचा पंचनाम्याचा अहवाल विभागीय कार्यालय सिल्लोडला पाठविण्यात येवून वीज प्रकरण अंतर्गत निकषानुसार शेतकऱ्याला मदतीसाठी महावितरण कडून पात्र करून मदत करण्याचा प्रयत्न करू
अभिजित गौर
सहायक अभियंता महावितरण सोयगाव



