सोयगांव येथील, शिवाजीनगर – आमखेडा मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन(व्हिडिओ)

0
11

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

दि.२९मार्च २०२२ वार :- मंगळवार रोजी सप्ताहाची सांगता झाली. यामध्ये प.पु.वैकुंठ वासी रामकृष्ण नाईक (दादा) यांच्या आशिर्वादाने , ह.भ.प.भागवत महाराज गाडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने ह.भ.प.श्री रवींद्र महाराज परेराव यांच्या संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. व दररोज रात्री ह।भ.प.श्री नारायण महाराज ढासाळेकर, अरुण महाराज जामठीकर, सौ.साक्षीताई भगत चौधरी, मनोज महाराज ऐनगाव, ताराचंद महाराज पाटील, आळंदी देवाची, गोरक्षनाथ महाराज काकडे ,वाघलगांव , रमेश महाराज पाटील, सुसरीकर आदी महाराजांची साप्ताहिक किर्तने झाली ह.भ.प.रवींद्र महाराज परेराव यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. यावेळी संस्थान व ग्रामस्थ मंडळी यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणें विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान व ग्रामस्थ मंडळी ,महामुनी अगस्ती महाराज वारकरी शिक्षण संस्था ,शिवाजी नगर आमखेडा, सोयगांव यांनी विशेष सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here