मुंबई : प्रतिनिधी
महाविकासआघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर 1 एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयानतर जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कवाढीलाही विरोध होत आहे. जोपर्यंत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी काही जणांनी केली आहे.
एक टक्का मुद्रांक शुल्क वाढणार
1 एप्रिलपासून, मुंंबईसह अशा सर्व शहरांमध्ये 1 टक्का मुद्रांक शुल्क वाढणार आहे जिथे मेट्रो ट्रेन्स बांंधल्या जात आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुद्रांक शुल्काची रक्कम वाचवण्यासाठी मालमत्ता खरेदीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
836 कोटींहून अधिक उत्पन्न
आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात 10,379 च्या तुलनेत एकट्या मुंबईत, या महिन्यात आतापर्यंत सुमारे 17 टक्के अधिक नोंदणी झाली आहे, म्हणजे 12,619. मार्च महिन्यात आतापर्यंत सरकारला 836 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.



