जळगाव : प्रतिनिधी
येथील दिव्य सूर्य महिला बचत गटातर्फे बांभोरी येथील गजानन महाराज मंदिरात पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष यशवंत पाटील (अण्णा महाराज), पूष्पा पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन झाले.
यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा आशा वाणी, प्रतिक्षा भावसार, हिरा श्रावगी, निळकंठ वाणी, राजू फडणीस, कमलाकर फडणीस, राजू बारी आदी उपस्थित होते.



