वैद्यकिय प्रतिनिधी संघटनांची निदर्शेने

0
30

जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वैद्यकिय प्रतिनिधी  संघटना जळगाव शाखेच्यावतीने आज देशव्यापी संपास सहभागी होतांना संघटनेच्यावतीने शहरात निदर्शेने करण्यात आली. व हातात फलक घेवून आपल्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरण्यात आला.
या निदर्शेनात संघटनेचे 650 सभासद सक्रिय सहभागी झाल्याचा दावा संघटनेने पत्रकात केलेला आहे. अखिल भारतीय संघटनेचे सदस्य कॉ.नरेंद्रसिंह व कॉ.रितेश शहा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शेने करण्यात आली. त्यात संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, रविंद्र अहलुवालिया, सागर घटक, चंपालाल पाटील, चेतन पाटील, महेश चौधरी, मनिष चौधरी, दिनेश जगताप, विशाल चौधरी, राजेश पोतदार यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here