Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन
    जळगाव

    ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

    SaimatBy SaimatMarch 26, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग जळगाव, व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक माननीय श्री आर एम लोळगे, माहिती व तंत्रज्ञान कायदा सोशल मीडिया, सहदिवाणी न्यायालय, रावेर, यांनी रॅगिंग म्हणजे विद्यापीठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही लेखी किंवा तोंडी कृती की, ज्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुःख किंवा कष्ट होईल असे असभ्य वर्तन होय. अशी व्याख्या सांगितली. त्यांनी मेसेज मधून एखाद्या इमेल मधून फोटो मधून डाटा मधून सुद्धा चूक होऊन त्याचे रॅगिंग मध्ये रूपांतर होते असे सांगितले. एखादा ई-मेल, एखादा फोटो, एखादा डाटा,मोबाईल मधून किंवा संगणका मधून काढून घेणे म्हणजे हॅकिंग होय ही हॅकिंग शाळेत झाली तर रॅगिंग होते व शाळेच्या बाहेर घडली तर ती चोरी होते. तुम्ही फ्री वाय वाय फाय कधीही देऊ नका कारण फ्री वाय-फाय मध्ये मेसेज, इमेज, ह्याक होऊ शकतात असे त्यांच्या मनोगतात सांगितले या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे माननीय एडवोकेट एस. जी. सांगळे, रावेर वकील संघाचे अध्यक्ष यांनी राज्यघटनेने मूलभूत हक्कांमध्ये असे सांगितले की प्रत्येकाला समान संधी, समान हक्क मिळाले पाहिजे महिलांना कुठल्याही मालमत्तेमध्ये पूर्वी अधिकार नव्हता, पूर्वी हुंडा पद्धती प्रचलित होती, आजही काही प्रमाणात बालविवाह होताना दिसतात, याला प्रतिबंध म्हणून कायद्याची निर्मिती केली गेली आहे. आज आपल्याला प्रमाणामध्ये लैंगिक गुन्हे दिसून येतात यावर प्रतिबंध म्हणून लैंगिक गुन्हे अधिनियम कायद्याची निर्मिती केली गेली असे त्यांच्या मनोगतात सांगितले.
    या कार्यशाळेचे तिसरे प्रमुख पाहुणे माननीय एडवोकेट किशोर पाटील रावेर वकील संघाचे सदस्य यांनी अँटी रॅगिंग संबंधी काही गोष्टी सांगितल्या. रॅगिंग ही पाश्चिमात्य देशातून आलेली संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये नवीन व्यक्तीची तोंडओळख व्हावी म्हणून रॅगिंग हा प्रकार निर्माण झाला. परंतु याचा गैरवापर होताना आपल्याला दिसतो. एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचविणे मानसिक इजा पोहोचविणे म्हणजे रॅगिंग होय. काही व्यक्ती वाईट लोकांच्या संगतीत राहून रॅगिंग करण्याकडे वळताना दिसतात त्यामुळे या रॅगिंगच्या प्रभावाखाली येवून दुसरी व्यक्ती सुद्धा स्वतः याकडे वळण्याची शक्यता असते असे त्यांच्या मनोगतात सांगितले
    या कार्यशाळेचे चौथे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष माननीय श्री ए.एच. बाजड दिवाणी न्यायाधीश, रावेर न्यायालय यांनी सुद्धा रॅगिंग ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची असू शकते. आणि सहसा ही रॅगिंग विद्यापीठ व महाविद्यालयीन क्षेत्रांमध्ये होताना आपल्याला दिसते. म्हणून ही रॅगिंग होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने यावर प्रतिबंध म्हणून काही उपाय सांगितले आहेत असे त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले. तसेच या कार्य शाळेचे पाचवे प्रमुख वक्ते माननीय श्री शीतल जोशी उपाध्यक्ष रावेर वकील संघ, रावेर हे सुद्धा उपस्थित होते त्यांनीसुद्धा रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयांमध्ये केले गेले पाहिजे असे त्यांच्या मनोगतात सांगितले.
    तसेच या कार्यशाळेचे सहावे प्रमुख वक्ते माननीय एडवोकेट योगेश चौधरी, सदस्य रावेर वकील संघ, रावेर यांनी सुद्धा रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो असे त्यांच्या मनोगतात सांगितले. तसेच या कार्यशाळेचे सातवे प्रमुख वक्ते माननीय शिवदास कोचुरे माजी विद्यार्थी सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांनीसुद्धा रॅगिंग करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे असे त्यांच्या मनोगतात सांगितले या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी लैंगिक छळ, शारीरिक इजा, मानसिक इजा हीसुद्धा रॅगिंग या प्रकारांमध्ये मोडते असे त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. सूत्रसंचालन महिला विकास अधिकारी प्राध्यापिका डॉ. निता वाणी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी केले. या कार्यशाळेला 112 विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. आर व्ही भोळे, प्रा. डॉ. के.जी. कोल्हे, प्रा. डॉ. एस. ए. पाटील प्रा. डॉ. पी. आर. महाजन प्रा एच.एम.बाविस्कर,प्रा. संजय बी.महाजन, प्रा. एम.के. सोनवणे प्रा. डॉ. विनोद रामटेके, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्राध्यापक मुळे प्राध्यापिका डॉ. नीता वाणी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी उद्घाटन समारंभाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक मुळे सरांनी मानले व संपूर्ण कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक प्रदीप तायडे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.