Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»व्यापार्यााची ऑनलाईन फसवणूक मुक्ताईनगरात गुन्हा दाखल
    मुक्ताईनगर

    व्यापार्यााची ऑनलाईन फसवणूक मुक्ताईनगरात गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamFebruary 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    तालुक्यातील हलखेडा येथे औषधीला वापरात येणारी काळी हळद देतो असे म्हणत एका व्यापार्‍याची ८६ हजाराची फसवणूक केली. तसेच त्यास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुर्‍हा येथील शुभम संजय पाटील याने औषधीसाठी लागणारी काळी हळद देतो असे सांगत गुजरातमधील व्यापारी साकीर अमहद हासीन आमलीवाला (वय ४५, रा. वालाड, जि.वापी) यास गुगल पे वरुन ८६ हजार ३०० रुपये मागवून घेतले होते. साकीर याने औषधीची हळद का दिली नाही म्हणून जाब विचारला असता शुभम पाटील हा टाळाटाळ करीत होता. शेवटी साकीर यांनी पाटील यास पैसे परत मागण्याचा तगादा लावला. पैसे घेण्यासाठी साकीर हा मुक्ताईनगर तालुक्यात आला असता शुभम पाटील व त्याच्यासोबत असणार्‍या १० ते १२ जाणांनी व्यापारी साकीर यास बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकात साकीर आमलीवाला यांच्या फिर्यादीवरुन शुभम पाटील याच्यासह १० ते १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि साळुंखे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.