Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»तीन गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर; शिबिरात ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी
    जळगाव

    तीन गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर; शिबिरात ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी

    SaimatBy SaimatMarch 23, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 
    रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे पोहोचत आहे. खेड्यापाड्यात घेण्यात येत असलेल्या कॅम्पद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ल्यासह येण्यासाठी गाडीचीही व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. मंगळवार, २२ मार्च रोजी यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
    जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील शिवाजी महाराज चौकात सोमवार, २१ मार्च रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मुधमेह, रक्तदाब, टू डी इको तपासणी अगदी मोफत करण्यात आली. याप्रसंगी मेडिसीन तज्ञ डॉ.तेजस कोटेचा, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, डॉ.कल्पना देशमुख, इंटर्न हर्षल राणे, सिद्धार्थ सिंग, आकाशे रेंगे यांनी आलेल्या रुग्णांच्या समस्या जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले. शिबिरासाठी नर्सिंगचे स्टाफचेही सहकायर्र्र्र् लाभले. या शिबिराचा ११३ नागरिकांनी लाभ घेतला असून ४२ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, टि.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ यांचे सहकार्य लाभले.
    यावल तालुक्यातील कासारखेडा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात मंगळवार, २२ मार्च रोजी भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. उद्घाटन माजी आमदार दादासाहेब रमेश विठ्ठल चौधरी, यावल-रावेर कॉंग्रेसचे गटनेते बापूसाहेब शेखर सोपान पाटील, चिंचोलीचे नानासाहेब अनिल साठे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आर.जी.पाटील, शेखर सोपान पाटील, उमाकांत रामराव पाटील, अनिल दंगल पाटील यांची विशेष उपस्थीती होती. शिबिरार्थी रुग्णांची मेडिसीन तज्ञ डॉ.सुशांत वागज, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, नेत्रविभागातील डॉ.अनुजा गाडगीळ, इंटर्न हर्षल राणे, प्रमोद सोळुंके, हेमंत, आयुष यांनी तपासणी केली. शिबिर आयोजन आणि यशस्वीतेसाठी कासारखेड्याचे सरपंच भागवत शंकर पाटील (बबलूभाऊ), आडगावचे सरपंच रशिद अकबर तडवी, प्रसाद दादा, बबलू न्हावी, भय्या दादा यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी दिपक पाटील, तुषार सुरे यांचे सहकार्य लाभले.
    भादली येथे मंगळवार, २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता निशुल्क अस्थिरोग निदान शिबिराला सुरुवात झाली. यात गुडघे दुखणे, पोटर्‍या दुखणे, सांधे दुखणे आदि हाडांसंबंधित विकारांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ.परिक्षीत पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच रुग्णांची तपासणीसुद्धा केली. या निशुल्क शिबिरामुळे भादलीकरांना दिलासा मिळाला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी टि व्ही पाटील, मकरंद महाजन यांनी प्रयत्न केले.
    मासिक पाळीत वेदना होणे, अंगावरुन अतिप्रमाणात पांढरे पाणी जाणे, पोटदुखी, वंध्यत्व आदि प्रकारच्या स्त्रियांच्या आजाराचे निदान शिबिर मंगळवार, २२ मार्च रोजी मोहाडी येथे घेण्यात आले. सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, रेसिडेंट डॉ.महेश देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी केली. यात महिलांनी महिलाच डॉक्टर असल्याने निसंकोचपणे समस्या सांगितल्यात, त्या जाणून घेत औषधोपचार आणि रुग्णालयात येवून काही तपासण्या करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला. या शिबिराचा ७६ महिलांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी रवि तायडे यांनी परिश्रम घेतले.
    याशिवाय २४ मार्च रोजी कोरपावली, २५ मार्चला संग्रामपूर तालुक्यातील कवठळ, अमळनेर याठिकाणी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.