जगात कोरोना प्रभाव कमी होत आहे, सर्व काही सुरळीत होत असतानाच आता काहीशी चिंता वाढविणारी बातमी येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या डेल्टाक्रॉनमुळे अनेक शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. हा नवा व्हायरस डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बनलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने अहवाल दिला आहे, की या नवीन डेल्टाक्रॉन प्रकाराची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत. या प्रकाराची फारच कमी प्रकरणे आतापर्यंत पाहिली गेली आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञांना या नवीन प्रकाराबद्दल पुरेशी माहिती नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 च्या तांत्रिक प्रमुख मारिया वान केरखोव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, या नवीन प्रकाराच्या तीव्रतेत आम्हाला कोणताही बदल जाणवलेला नाही. हा प्रकार किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे हे कळण्यासाठी आम्ही यावर लक्ष देवत असल्याचेही त्यांनी सांगितले. शास्त्रज्ञांना या प्रकाराचा प्रसार होण्याची भीती आहे. मारिया वान केरखोव यांनी सांगितले की, आम्ही या प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहोत. प्राण्यांना या विषाणूची लागण होत असल्याने अशा स्थितीत मानवही त्याच्या संपर्कात येऊ शकतो. त्यामुळे महामारी अजून संपली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात‘डेल्टाक्रॉन’ची पुष्टी केली आहे. शास्त्रज्ज्ञांनी सांगितले, की हा प्रकार डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांचा बनलेला आहे.
‘डेल्टाक्रॉन’ कधी उघड झाला?
या प्रकाराचे अहवाल प्रथम जानेवारी 2022 मध्ये समोर आले, जेव्हा ‘साइप्रस’च्या एका संशोधकाला कोरोनाव्हायरसचा नवीन प्रकार सापडला. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की या प्रकाराचा मुख्य भाग ओमिक्रॉनपासून डेल्टा आणि स्पाइकचा बनलेला आहे.
काय काळजी घ्यावी?
या नवीन प्रकाराबाबत आतापर्यंत शास्त्रज्ञांना फारशी माहिती मिळालेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकार किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे हे सांगणे फार कठीण आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, या नवीन प्रकाराच्या तीव्रतेमध्ये आतापर्यंत कोणताही बदल झालेला नाही. हार्वर्ड टीएच चॅन स्कूलचे एपिडेमियोलॉजिस्ट विलियम हैनेज म्हणाले, या प्रकाराची आणखी प्रकरणे समोर आली नसल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
तज्ज्ञांच्या मते, जगभरातील अनेक देशांमध्ये डेल्टाक्रॉन प्रकारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारताबद्दल बोलायचे झाल्यास, डेल्टाक्रॉनची प्रकरणे अद्याप आढळून आली नाहीत. काही प्रकरणांमध्ये, ओमिक्रॉन आणि डेल्टाचे मिश्रित संक्रमण निश्चितपणे पाहिले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी संध्याकाळी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत कोरोना विषाणूच्या या प्रकाराबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत या नवीन प्रकाराच्या अहवालांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग तपासण्यास सांगितले आहे.
डेल्टाक्रॉनची लक्षणे
युरोपची हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी सध्या डेल्टाक्रॉनवचे निरीक्षण करत आहे. कोरोनाचे हे नवीन रूप किती धोकादायक आहे हे शोधणे खूप कठीण आहे. अद्याप कोणतीही नवीन लक्षणे दिसून आलेली नाहीत. अशा परिस्थितीत, ‘एनएचएस’च्या आधीच्या सल्ल्यानुसार, पुढील काही लक्षणे आहेत ज्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे.
– ताप
– कफ
– वासाची क्षमता कमी होणे
– सर्दी
– थकवा जाणवणे
– डोकेदुखी
– श्वासोच्छवासाची समस्या
– स्नायू किंवा शरीरात वेदना
– घसा खवखवणे
‘डेल्टाक्रॉन’प्रतिबंधासाठी हे करा
व्हायरसचा प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोविड नियमांचे पालन करणे. यामुळे हा विषाणू विकसित होण्याची आणि वाढण्याची शक्यता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, मास्क घाला, सामाजिक अंतर राखा आणि हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या.