‘…हा तर गोपनीयतेचा भंग’ – चव्हाण

0
83

पुणे : वृत्तसंस्था
सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस मोरेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत ही तक्रार देण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह हा तेजस मोरे यानेच पुरवला, असा आरोप चव्हाणांनी केला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर तेजस मोरेचा शोध पोलीस घेतात का, हे पाहावे लागेल. जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप नुकताच केला होता. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावे पुढे येणार आहेत.
‘व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता’
व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर चौकशीनंतर सर्व गोष्टी पुढे येतील, थोडा वेळ द्या. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री किंवा सरकारकडून माझ्याशी काही बोलणे झालेले नाही. या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एक कॉन्स्टेबलही सहभागी आहे. लवकरच त्यांची नावे समोर येतील, असा दावाही चव्हाण यांनी केला होता. माझा सरकारशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसल्याचेही चव्हाण म्हणाले होते.
‘ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी’
आता या सर्व प्रकरणावर प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला असून शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे, असे म्हणत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस आता काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here